सामान्य अध्ययनाचे (G.S.) महत्त्व

1411 View

Publish Date:
2017-05-22
Category:
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना

UPSC च्या अभ्यासाला सुरवात झाली कि पहिला प्रश्न पडतो----  सुरवात कशाने करावी? – GS ने की Optional ने ? सध्या UPSC म्हणजे GS असे समीकरणच झाले आहे. एकतर हा विषय अनिवार्य असल्याने त्यात जर तुम्ही इतरांच्या मागे पडला तर ती GAP भरून काढणे आवश्यक आहे. Prelims ला तुमचा result केवळ GS च्या गुणांवरच अवलंबून आहे. Mains ला तर सरळ सरळ GS चे चार पेपर आहेत. तसेच निबंध आणि मुलाखत सुद्धा शेवटी GS वरच अवलंबून आहे. GS ची तोंडओळख Optional निवडीसाठीही उपयोगी ठरते. याविषयीची चर्चा मी पुढील व्हिडीओत केली आहे. तुम्हाला विषय आणि तपशील आवडला तर कृपया तो शेअर करण्यास विसरू नका.
 
स्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach  आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. त्या दृष्टीने सिनार्जीचा हा प्रयत्न. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी सिनर्जी स्टडी पॉईंट, पुणे चे संचालक श्री. अतुल लांडे, काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.