वृत्तपत्रांचे वाचन (News Papers Reading)

2018 View

Publish Date:
2017-05-25
Category:
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना

स्पर्धा  परिक्षेतील (UPSC – MPSC) बहुतांश प्रश्न चालू घडामोडींवर आधारित असतात. त्यामुळे अभ्यास करताना सगळ्यात जास्त वेळ दिला जातो तो वृत्तपत्रांच्या वाचनासाठी. म्हणून हा व्हिडीओ. यात मी कोणता पेपर वाचावा, कसा वाचावा, त्यातील विविध घटक कसे अभ्यासावे, त्याच्या नोट्स कश्या काढाव्यात इ. बाबींची चर्चा केली आहे. तुम्हाला विषय आणि तपशील आवडला तर कृपया तो शेअर करण्यास विसरू नका.
 
स्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach  आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. त्या दृष्टीने सिनार्जीचा हा प्रयत्न. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी सिनर्जी स्टडी पॉईंट, पुणे चे संचालक श्री. अतुल लांडे, काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.