भारतीय अर्थव्यवस्थेचा आभ्यास कसा करावा

1065 View

Publish Date:
2017-04-20
Category:
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना

UPSC आणि MPSC च्या सर्वच परिक्षांना भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास अनिवार्य असतो. बहुतांशी विद्यार्थ्यांचा या विषयाशी पहिल्यांदा संबंध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करायला लागल्यावरच येतो. कोणतीच पार्श्वभूमी नसल्याने सुरवातीला गोंधळ उडतो. इतर विषयांची तुलना करता या विषयात घटकांची inter-connectivity खूप जास्त आहे. त्यातच या विषयाशी संबंधित घडामोडी दररोज घडत असतात. त्यामुळे विषयाशी निगडीत संदर्भ सातत्याने update करण्याची गरज पडते.
 
बऱ्याच वेळेला मूळ संकल्पना, त्यांचे अर्थ, त्यांच्या व्याख्या, निगडीत आयामही बदलतात. या आव्हानांमुळे अभ्यास नक्की कसा करावा, किती खोलीपर्यंत करावा याचा विद्यार्थ्यांना अंदाज येत नाही. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सिनर्जीचे संचालक श्री. अतुल लांडे यांनी या video मध्ये केला आहे.
 
स्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach  आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. त्या दृष्टीने सिनार्जीचा हा प्रयत्न. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी सिनर्जी स्टडी पॉईंट, पुणे चे संचालक श्री. अतुल लांडे, काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.

Synergy Study Point, as a UPSC Coaching Institute, strive to have an undivided focus on creating success stories as the Unique Selling Proposition. Located at the education hub Pune, Maharashtra, Synergy is undoubtedly a leading coaching institute for Civil Services (UPSC) and State Services (MPSC) Examination, in India.  In past 11 years, with the focus on quality teaching, we have created unparalleled track record and 500+ success stories in Civil Services (UPSC) and State Services (MPSC) Examination. Teaching is a noble profession; we are committed to its values. We truly feel that the field of education needs to maintain its sanctity even with more caution during such changing times. We at ‘Synergy’ intend to ignite minds of thousands of capable and deserving young graduate population of the nation and guide their aspirations to succeed in competitive examinations to its conclusion.