कोचिंग क्लास लावण्यापूर्वी....

713 View

Publish Date:
2017-05-11
Category:
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना

सध्या UPSC – MPSC च्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे. जाहिरातीच्या या युगात कशावर विश्वास ठेवावा, हेच कळत नाही.

माझा तुम्हाला सल्ला आहे, तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे,  त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेताना गडबड करू नका. कोणताही क्लास लावताना कोणत्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे, याची चर्चा मी बरोबरच्या व्हिडीओत केली आहे. सगळ्या क्लासेसला भेट द्या आणि या बाबींची खातरजमा करून मगच निर्णय घ्या. आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. तुम्हाला विषय आणि तपशील आवडला तर कृपया तो शेअर करण्यास विसरू नका.
 
स्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach  आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. त्या दृष्टीने सिनार्जीचा हा प्रयत्न. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी सिनर्जी स्टडी पॉईंट, पुणे चे संचालक श्री. अतुल लांडे, काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.